साखर कारखान्याचे वजन काटे तपासा | महेश खराडे ; कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

0
2



सांगली : साखर कारखानदार वजनात मोठ्या प्रमाणात चोरी करतात,मात्र वजन मापे विभाग दुर्लक्ष करतोय,सर्व कारखान्याचे वजन काटे तात्काळ तपासा,अन्यथा कार्यालयाला टाळे टोकू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे,जिल्ह्यातील अनेक कारखान्याचे वजन काटे चुकीचे आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ऊस वजनात लूट सुरू आहे. बाराशे ते तेराशे किलोचा एक टन केला जातो,या वजन काट्याची तपासणी व्यवस्थित केली जात नाही.





या विभागातील अधिकारी आणि साखर कारखानदारांच्या साटे लोटे आहे.त्यामुळे दिवसा ढवळ्या शेतकऱ्याच्या उसावर दरोडा घालण्याचे काम सुरू आहे.वजनात चोरी होत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यास, ऊस तोडणी मजूर व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन धरकानांही याचा फटका बसतोय.वजनावर मजुरांना मजुरी मिळते तर वजनावरच वाहतूक दारांना भाडे मिळते,मात्र कमी वजनामुळे यातील सर्वच घटक भरडले जात आहेत.


सांगली : वजन काटे विभागाच्या वंदना गायकवाड यांना निवेदन देताना महेश खराडे व अन्य

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here