जत,(संकेत टाइम्स) : जत तालुक्यात पुर्व भागातील शेतकरी,नागरिक सातत्याने अवर्णषाने अडचणीत आहेत.देश,राज्यात अनेक योजना कृषी विभाग,पंचायत समितीकडून जाहीर होतात.मात्र त्यां गरज असणाऱ्या शेतकऱ्यांपर्यत पोहचतच नसल्याचे भयान वास्तव पुर्व भागात आहे.तालुक्याच्या कृषी विभागाने खऱ्या अर्थांने याबाबत शेतकऱ्यांच्यात जागृत्ती करण्याची गरज आहे.
मात्र त्यांच्याकडून पिके आल्यानंतर एकादा-दुसरा कार्यक्रमा शिवाय काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत.पुर्व भागातील शेतकऱ्यांना साधी माहिती मिळविण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागत असल्याने योजना मिळेपर्यतचे दिव्य काय असेल यांचा विचार न केलेला बरा,अशी वस्तूस्थिती आहे.रात्रन् दिवस काबाड कष्ठ करायचे पिके आणायची त्यात हातातोंडाला आलेल्या पिंकांना बिगरमोसमी पाऊस,वादळाचा फटका झेलायचा त्यातून वाचलेल्या पिके काढून मार्केटमध्ये विक्री करताना पुन्हा मातीमोल किंमत घेऊन डोळे झाकून घरी परतायचे,अशी परिस्थिती या परिसरातील या निगरगठ्ठ यंत्रणेंने करून ठेवली आहे.गोडगोड बोलून विकासाची स्वप्ने दाखविणारे लोकप्रतिनिधी तसेच बनल्याने आम्ही कसे जगायचे, असा येथील शेतकरी,नागरिकांचा सवाल आहे.
कृषी विभागाची मुर्दाड यंत्रणा
जत तालुक्यात कृषी विभागाकडून शासनाच्या योजना जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पर्यत पोहचविण्याची जबाबदारी आहे.मोठा कर्मचारी, अधिकारी वर्गही आहे.मात्र शासनाच्या अनेक योजना या भागातील गरजवंत शेतकऱ्यांपर्यत पोहचविल्याच जात नसल्याचे वास्तव आहे.या भागात नेमलेले अधिकारी,कृषी सहाय्यक गावातील काही मोजक्याच मंडळींना हाताशी धरून सोपस्कर पुर्ण करत आहेत.एकाद्या योजनेसाठी एकादा सामान्य शेतकरी या कार्यालयात गेला तर थेट वरिष्ठ अधिकाऱ्यां पर्यत लक्ष्मी दर्शनाशिवाय हालचाल होत नसल्याचे आरोप होत आहेत.