
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात आज पासून कोविड लसीच्या लसीकरणास सुरूवात होणार आहे. तालुक्यातील वळसंग प्राथमिक आरोग्य
केंद्र व जत नगरपरिषद हद्दीतील
सुमारे 200 डॉक्टर्स,आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात हि लस दिली जाणार आहे.
तालुक्याला सिरम् कंपनीची कोविशिल्ड लसीचे तीनशे डोस प्राप्त झाले आहेत.पहिल्या टप्यात वळंसग व जतमधील 200 कर्मचाऱ्यांना ही लस जत ग्रामीण रुग्णालय येथे देण्यात येणार आहे.
तालुक्यातील खाजगी 456 व शासकीय 1436 आरोग्याशी निगडीत डॉक्टर्स,कर्मचाऱ्यांनी लसीसाठी नोंदणी केली आहे.यात आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविकांचाही समावेश आहे.तालुक्यात एकूण 1192 जणांना ही लस सध्या दिली जाणार आहे.
पहिल्या डोसनंतर 28 दिवसानंतर त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. डोस दिल्यावर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कुणालाही कसलाही त्रास झाल्यास त्यांना तात्काळ उपचार करण्यात येतील अशा ठिकाणचे कर्मचारी आम्ही पहिल्या टप्यासाठी निवडले असल्याची माहिती, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय बंडगर यांनी दिली.






