उटगीतील जळिग्रस्त कुंटुबियांना तुकाराम बाबाची मदत

0
6



जत,(संकेत टाइम्स) उटगी ता.जत येथील कळ्ळी वस्तीवरील जळीतग्रस्त कुंटुबियांची संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेची टीम तात्काळ तेथे पोहचून भेट घेत धीर दिला.गुरुवारी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा याच्यांहस्ते मेटगार कुटूंबियांना रोख पाच हजार रुपये,संसार उपयोगी साहित्य देण्यात आले.शेतमजूर‌ असलेल्या रेवप्पा रायप्पा मेटगार यांच्या घरास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले होते.त्याचे कुंटुबिय उघड्यावर आले आहे. त्यांना तुकाराम बाबा यांनी मदत देत आधार दिला आहे.माजी सरपंच भिमाण्णा बिराजदार,माजी उपसरपंच चंद्रकांत डोळळी यांनीही आर्थिक मदत केली.यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य परप्पा गडदे, चिदानंद तेली,दशरथ कोळी उपस्थित होते.



उटगीतील शेतमजूरांच्या कुंटुबियांची तुकाराम बाबा यांनी भेट घेतली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here