आवंढीतील महिला बचत गटांना 15 लाखाचे कर्जाचे वितरण

0
9



आवंढी,संकेत टाइम्स : महाराष्ट्र राज्य  ग्रामीण जीवन उन्नती अभियान (उमेद)अंतर्गत आवंढी गावातील 15 बचत गटांना प्रत्येकी 1 लाख असे 15 लाख कर्जाचे वाटप करण्यात आले.उमेद अभियानचे सांगली जिल्हा डीएमएम अतुल नांद्रेकर व बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी श्री.डोळ्ळी यांच्या उपस्थितीत कर्ज रक्कमेच्या चेकचे वाटप करण्यात आले.








यामुळे गावातील महिलांना मोठी मदत झाली आहे.त्यांना स्वंयपुर्ण करण्याचा उद्देश शासनाचा असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.अन्य गटानांही लवकरच कर्ज वाटपत करण्यात येणार आहे.आवंढी गाव हे जिल्हातील बचत गटाचे मॉडेल गाव करण्याचे आश्वासन उमेद चे जिल्हा डीएमएम अतुल नांद्रेकर यांनी दिले.लोकनियुक्त सरपंच आण्णासाहेब कोडग, उपसरपंच आण्णासाहेब बाबर,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.ढेरे,श्री.महामुनी,श्री.साळुंखे,श्री.कांबळे,श्री.माळी,सीआरपी उषा बाबर, 

रत्नप्रभा कोडग व गावातील बचत गटाच्या महिला उपस्थितीत होत्या.


आवंढीतील महिला बचत गटांना बँक ऑफ महाराष्ट्र कडून 15 लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here