जत,प्रतिनिधी : बेजबाबदार वाहन चालवून अपघात करून मुत्यू कारणीभूत ठरल्याबद्दल सुभाष मुरग्याप्पा तेरदाळ रा.खोजानवाडी यांच्या विरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सुरेश मुरग्याप्पा तेरदाळ यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी,फिर्यादी यांचे मेहूणे हे दुचाकीवरून मेंढिगिरी येथून जतकडे येत असताना बिज्जरगी मळ्याजवळ संशयित सुभाष मुरग्याप्पा तेरदाळ यांच्या ताब्यातील डेपोने धडक दिली.त्यामध्ये विश्वनाथ कोटी यांचा मुत्यू झाला.अपघात झाल्यानंतर संशयिताने टेम्पो पळवून नेहण्यात आला होता,असे फिर्यादीत म्हटले आहे.






