‘जत प्रेस क्लब जत’ची स्थापना | संकेत टाइम्सचे शिलेदार आता या क्लबच्या माध्यमातून समाजाचे आरसा बनतील

0
9




जत,(संकेत टाइम्स वृत्तसेवा) जत प्रेस क्लब जत ही पत्रकारांची नवी व नोंदणीकृत्त संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.अध्यक्ष हणमंतराव दत्तात्रय बाबर(आंवढी) तर, उपाध्यक्ष कल्लण्णा भैरसिध्द बालगाव(करजगी)यांची निवड करण्यात आली आहे.

जत तालुक्यातील जनतेला न्याय,हक्क मिळवून देण्यासाठी दैनिंक संकेत टाइम्स या दैनिंकाचे शिलेदार या संघटनेचे पदसिध्द सदस्य आहेत.पत्रकारांच्या समस्येसह 

स्वस्तधान्य मिळत नाही,तलाठी,ग्रामसेवक दाखल घेत नाहीत,कृषी अधिकारी लक्ष देत नाही,ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नाही.शासकीय अधिकारी अडवणूक करतात,अशा जनतेचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या संघटनेचे पदाधिकारी, सदस्य काम करत राहतील.आमच्या सदस्याकडे येणाऱ्या

प्रत्येक नागरिकांच्या प्रश्नासाठी आम्ही गाव,तालुका,जिल्हा स्तरावर पाठपुरावा करून त्या समस्या सोडविण्यासाठी माध्यम म्हणून प्रयत्न करत राहू.पत्रकार म्हणून समाजाचे डोळे,कान व हात म्हणून आमचे सर्व पदाधिकारी, सदस्य काम करतील.

पत्रकारांची वेगळी ओळख यानिमित्ताने समाजापुढे ठेवण्याचा आमचा यापुढे स्वच्छ प्रयत्न असेल. 

या संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे दुर्लक्षीत असणाऱ्या गावातील आहेत.जेथे जनतेला लुटणाऱ्या समाजसेवेची झूल पांघरलेल्या यंत्रणेला वटणीवर आणण्यासाठी आमचे हे शिलेदार काम करतील.आमच्या विचाराबरोबर काम करणारे पत्रकार आमच्या सोबत सामील होऊ शकतील.



राजू माळी,

संस्थापक,जत प्रेस क्लब ऑफ जत

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here