दु:खद बातमी | करजगीत कर्जास कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या

0
8



करजगी(संकेत टाइम्स वृत्तसेवा);

येथील शेतकऱ्यांने कर्जास कंटाळून गळपास लावून घेतल्याची दु:खद घटना बुधवारी मध्यरात्री घडली आहे.

सिध्दाप्पा शरणाप्पा पट्टणशेट्टी वय 55 असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. याप्रकरणी उमदी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.




घटनास्थळ व पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, करजगी येथे सिध्दाप्पा पट्टणशेट्टी यांनी शेतजमीन आहे.गेल्या काही वर्षात अनेक बँका,सावकारांचे कर्ज काढून त्यांनी शेतीतून उत्पादन काढण्याचे प्रयत्न केले मात्र निसर्गांच्या प्रकोपाने पट्टणशेट्टी यांना शेतीतून अपेक्षीत उत्पादन येत नव्हते.परिणामी कर्जाचे हप्ते त्यांना फेडता न आल्याने बोजा वाढला होता.त्यामुळे पट्टणशेट्टी मानसिक दबावात‌ होते.




त्या दबावातून बुधवारी मध्यरात्री राहत्या घरात लोखंडी अँगलला त्यांनी गळपास लावून घेतला.गुरूवारी सकाळी हा प्रकार समोर आला. पोलीसांना घटना कळविण्यात आली.दरम्यान पोलीस पथकांने घटनास्थळी भेट देत मृत्तदेह खाली उतरवत पंचनामा करून मृत्तदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिला.सिध्दाप्पा पट्टणशेट्टी यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,सून असा परिवार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here