जत,प्रतिनिधी : कॉग्रेसचे आमदार
विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक भुपेंद्र कांबळे नेतृत्वाखाली जत तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीत 10 सदस्य विजयी झाले आहेत.
दलित पँथरच्या माध्यमातून भुपेंद्र कांबळे यांनी प्रभावी काम सुरू केले आहे. त्यांना माननारा मोठा वर्ग तालुक्यात निर्माण झाला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांचे समर्थक
आयु.विशाल सर्जे(सिंगणहळ्ळी),सौ.लताताई कांबळे-(सनमडी),सौ.माधवी सर्जे (गुड्डापूर),शंकर कांबळे (गुगवाड),मिनाताई वाघमारे(येळदरी),राजेंद्र चलवादी (भिवर्गी),अजित कांबळे(मेंढीगिरी)सौ.राचव्वा धोडमणी(उमराणी),सौ.महादेवी केंचनाळ(उमराणी),अमर कांबळे(उमराणी) असे दहा सदस्य निवडून आले आहेत.
महत्वाच्या काही ग्रामपंचायतीत दलित पँथर किंगमेकर असून काही गावातील सत्तेत आम्ही प्रवेश केला आहे. येत्या काळात या पँथरच्या माध्यमातून समाजाच्या हिताचे प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य असणार आहे.त्याशिवाय पँथरची चळवळ प्रभावी करू,असे भूपेंद्र कांबळे म्हणाले.
दलित पँथरचे विजयी उमेदवारांचे सत्कार भूपेंद्र कांबळे व मान्यवर







