जत,(संकेत टाइम्स) : खलाटी ता.जत येथील ग्रामसेवकांच्या गैरकारभाराची खातेनिहान चौकशी करावी,अशी मागणी रिपाइचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केली.
तसे निवेदन जिल्हा परिषदचे सा.सिईओ चंद्रकांत गुड्डेवर यांना दिले.
निवदेनात म्हटले आहे,खलाटी ता.जत येथील ग्रामसेवक हे दलित वस्ती सुधारणेची काम हे स्व:ता करित आहेत.काही सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांच्या नावावर बेकायदेशीर घेण्यात आली आहेत.या कामासंदर्भात माजी उपसंरपच शहाजी जाधव यांनी दोन महिन्यापुर्वी तक्रार केली आहे. तरीही दखल घेतलेली नाही.खलाटीचे ग्रामसेवक यांचा सर्व कारभार संशयास्पद आहे.त्यांची खातेनिहान चौकशी व्हावी,मागासवर्गीय पंधरा टक्के निधी व अन्य विकास निधीतून ग्रामसेवकांने अनेक कामे स्व:ताच केली आहेत.अशा भ्रष्ट ग्रामसेवकांवर कारवाई करावी,असे निवेदनात म्हटले आहे.





