जत,(संकेत टाइम्स) : पाच वर्षातून एकदा येऊन पैशाच्या जिवावर सत्ता मिळविणाऱ्या चव्हाण बंन्धूना वळसंगच्या जनतेने धडा शिकवला,असा आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेश शिंदे यांनी केला.
भाजपचे नेते अँड.एम.के.पुजारी यांच्यासह नव निर्वाचित ग्रा.प.सदस्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.आता वळसंग ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता स्थापन होणार आहे.
शिंदे पुढे म्हणाले की,वळसंगच्या चव्हाण बंधूनी गेल्या दहा वर्षांत वळसंग गावची वाट लावली आहे.दरवर्षी ग्रामपंचायतीला मिळणारा पवनचक्कीचा लाखो रुपयांचा कर खाऊन टाकला आहे. गेल्या दहा वर्षांत हा कर कोठे घालविला हे आता जनतेला सांगावे लागणार आहे.आता वळसंगमध्ये विकासाचे वारे वाहणार असून आता ग्रामपंचायतमीध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता आली असून यापुढे एक दिलाने काम करीत गावांचा चेहरामोहरा बदलू,असेही शिंदे म्हणाले.
रमेश पाटील म्हणाले की,तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे विचार माननारी संख्या वाढत आहे.अँड.एम.के.पुजारी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आमची ताकत वाढली आहे.चव्हाण बंन्धूचा भ्रष्ट कारभार आता संपुष्टात आला आहे. वळसंग ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहेच,त्यापुढे तालुक्यात राष्ट्रवादी मजबूत करू
अँड.एम.के.पुजारी म्हणाले,गावाच्या विकासाचे काही घेणे देणे नसलेल्या विरोधकांनी पाच वर्षातून एकदा येऊन निवडणुकीत पैसा उधळणे एवढेच काम केले आहे.पुढच़्या पंचवार्षिक निवडणूकीत नऊच्या नऊ उमेदवार निवडून आणू.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण,सिधुअण्णा शिरसाड,उपनगराध्यक्ष आप्पा पवार,विजय बिराजदार,संजय शिंदे,हेमंत खाडे,अशोक कोळी,पवन कोळी,जयंत भोसले,पांडुरंग मळगे,शफीक इनामदार आदी उपस्थित होते.
वळसंग ता.जत येथील अँड.एम.के.पुजारीसह चार सदस्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.








