जत,प्रतिनिधी : सिंगनहळ्ळी ता.जत येथे निवडणूकीच्या विजयानंतर दुचाकीची पुगळी काढून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या दोघा विरोधात जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. समाधान चंदू हिप्परकर,नानासाहेब शंकर कांबळे (रा.सिंगनहळ्ळी)अशी गुन्हे दाखल झालेल्याची नावे आहेत.
सिंगनहळ्ळी ता.जत येथे ग्रामपंचायत निवडणूकीनंतर संशयित दोघे दुचाकीची पुगळी काढून मोठ्या आवाजाने गावातून फिरवत होते.पोलीसांनी त्यांना पकडत ही कारवाई केली आहे.पोलीस कर्मचारी विकास ज्ञानेश्वर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.






