व्हीआयपीचा जीव जाण्याची वाट बघताय का?| जतच्या निकृष्ठ रस्ते‌ कामाला जबाबदार कोन ; का गप्प बसत आहेत,लोकप्रतिनिधी

0
7




जत,(संकेत टाइम्स) जोवर सर्वसामान्यांना धक्का बसतो, तोवर शासन-प्रशासन केवळ आश्वासनांच्या फैरी झाडत असतात आणि तोंडदेखल्या कारवाईने मिशा पिळत असतात. मात्र, जेव्हा व्हीआयपींना धक्का बसतो तेव्हा झोपेचे सोंग घेतलेली व्यवस्था खडबडून जागी होते. हे चित्र अनेक वर्षांपासून सातत्याने दिसून येते. जत‌ तालुक्यात खड्डेमय रस्ते करून भ्रष्ट अधिकारी,ठेकेदारांवर कठोर कारवाईसाठी ‘व्हीआयपी’ घटनेचीच वाट बघायची का, असा सवाल मजबूत व्हायला लागला आहे.

जत तालुक्यात गेल्या वर्षभरात केलेले सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून खड्ड्याचा घेर कधी कुणाचा जीव घेईल यांचा नेम नाही.तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागांच्या भ्रष्ट अधिकारी व ठेकेदाराच्या साखळीने तालुक्यातील रस्ते खावून टाकले आहेत.कोणतेही काम दर्जाहीन करा तरचं आपला फायदा होईल असा एकप्रकारे संदेशच येथील अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या मदतीने दिल्याचे स्पष्ट होत आहे.रस्ते करण्याचे नियमच या अधिकारी व ठेकेदारांनी बासनात गुंडाळून ठेवले आहेत.

अगदी नवा रस्ता एक दोन दिवसात उखडला जात असलेलतर फक्त निधी खर्च करण्यासाठी कामे होतात का ?असा सवाल वाहनधारक,नागरिक विचारत आहेत.

या निकृष्ट व खड्डेमय कामामुळे अनेकांचे जीव गेले असून खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात अनेक वाहनधारक,नागरिकांना कायमचे अंपगत्व आले आहे.इतके घडत असतानाही तालुक्यातील गलेलठ्ठ पगार घेणारे अधिकारी व लोकांनी मोठ्या‌ आशेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी करतात काय असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.भविष्यात एकाद्या व्हिआयपीचा जीव गेल्यावर खड्डे मुजविणार असा सवाल यानिमित्ताने तालुक्यातील अनेक रस्त्याच्या अवस्थेमुळे समोर येत आहे.



जत‌ तालुक्यात नव्याने केलेले रस्त्यावर डांबरीकरण केल्यानंतर दोन दिवसात खड्डी उखडून खड्डे पडले आहेत.

 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here