आंवढी,वार्ताहर : राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी आंवढी ता.जत येेथे भेट देणार असून,त्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती,सावकर उद्योग समुहाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबलू कोडग यांनी दिली.कोडग यांनी लोकनेते राजारामबापू पाटील पुण्यतिथीनिमित्त इस्लामपूर येथे आलेले आ.मिटकरी यांची भेट घेतली.
कोडग म्हणाले,आ.मिटकरी यांचा आमदार झाल्यानंतर जत तालुक्याचा पहिला दौरा असून यावेळी तालुक्यातील विविध ठिकाणी सत्कार व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आंवढी येथे आ.मेटकरी यांचा जंगी नागरी सत्कार व विविध कार्यक्रम होणार आहेत.त्याशिवाय राष्ट्रवादीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचेही कोडग यांनी सांगितले.
इस्लामपूर येथे आ.अमोल मिटकरी यांच्याशी चर्चा करताना शशिकांत उर्फ बबलू कोडग






