शेगावमध्ये सत्तांतर,भाजपा,राष्ट्रवादीचा मोठा विजय

0
21



शेगाव,वार्ताहर : शेगाव ता.जत येथील ग्रामपंचायतीत सत्ताधारी कॉग्रेसचा पराभव करत भाजपा,राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पँनेलने 12 जागा जिंकत एकहाती सत्ता हस्तगत केली.गेल्या पाच वर्षातील एकाधिकारशाही,नाराजीचा फटका येथे कॉग्रेसला बसला असून मोठी ग्रामपंचायतीवर भाजपाला सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे.

येथे राष्ट्रवादीशी फारकत घेणेही कॉग्रेसला महागत पडल्याचेही स्पष्ट असून जनाधार घटल्याने कॉग्रेसचे पानीपत झाले आहे.तेरा सदस्य संख्या  असलेल्या ग्रामपंचायतीत भाजपा राष्ट्रवादीच्या पँनेलचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत.







भाजपा,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन ग्रामविकास आघाडीने लक्ष्मण बोराडे,दिगंबर निकम,राजेंद्र नाईक,दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली त्यात सचिन हणमंत बोराडे, 

कृष्णदेव बाळाराम बुरूटे, हणमंत शिवाजी माने,सुनिता महादेव माने, 

शितल भारत व्हनमाने, सतिश चंद्रकांत नाईक, काजल संजय बुरूटे, 

दत्तात्रय दाजीसो व्हनमाने, हौसाबाई तुळशीराम नलवडे, स्वाती काका सावंत,पूनम जावेद मुजावर, विष्णू सखाराम शिंदे हे उमेदवार विजयी झाले आहेत.तर रविंद्र पाटील,दत्तात्रय निकम यांच्या पँनेलच्या सौ.वर्षाराणी साहेबराव शिंदे यां एकमेव विजयी झाल्या आहेत.

माजी आमदार विलासराव जगताप यांचे निकटवर्ती लक्ष्मण बोराडे यांच्या प्रयत्नाला मोठे यश आले आहे.भविष्यात गावातील विकासाला प्राधान्य देऊन विकात्मक योजना राबवू,असे बोराडे यांनी सांगितले.





शेगाव येथील विजयी पँनेलच्या समर्थकांनी जल्लोष केला.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here