जत,संकेत टाइम्स वृत्तसेवा : जत तालुक्यात 30 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील 29 ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी झाहीर झाले.त्यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत.
तालुक्यातील अंकले,शेगाव,उमराणी,उटगी,भिवर्
धावडवाडी आदी गावात सत्तांतर झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.तर टोणेेेेवाडी येथे
बिनविरोध निवडणूक झाली होती.
कॉग्रसचे आमदार विक्रमसिंह सांवत व भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गटात खऱ्या अर्थाने लढती झाल्या आहेत.दुसरीकडे राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेश शिंदे, जनसुराज्यचे नेते बसवराज पाटील यांच्या गटानेही अनेक ग्रामपंचायतीत सत्तेत सहभाग मिळविला आहे.
या निकालात कॉग्रेस 11,भाजपा 9,स्थानिक आघाडी 9 गावात विजयी झाल्याचे समोर आले आहे,तर कॉग्रेसने 16,भाजपने 14,राष्ट्रवादी कॉग्रेस 3 ग्रामपंचायतीत जनसुराज्य पक्षाने 3 ग्रामपंचायतीत सत्तेत आल्याचा दावा केली आहे.
युवा नेते विक्रम ढोणे समर्थक विजयी
जत तालुक्यात सामाजिक विषयावर आवाज उठविणारे युवा नेते विक्रम ढोणे समर्थक विलास सरगर कुडणूर ग्रामपंचायतीत विजयी झाला असून ढोणे यांनी तालुक्यातील सत्ताकेंद्रात चंचूप्रवेश केले आहे.










