जत,प्रतिनिधी : जत शहरात नव्याने तयार करण्यात येत असलेला विजापूर-गुहागर महामार्ग ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार पणामुळे अपघात प्रणव क्षेत्र बनत आहे.शहरातील भ्रष्ट वाहतूक पोलीसांच्या दुर्लक्षामुळे शहरातील या प्रमुख रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करण्यात येत आहेत.त्याशिवाय बेजबाबदार पणे वाहने चालवून काही युवकांकडून मोठ्या वाहनाना अडचण केली जात आहे.
या अवैध पार्किंगचा फटका शहरातील निगडी कार्नरला बसला.स्टँडकडून शेगाव चौकाकडे चालेल्या एका स्विप्ट गाडीला काळीपिवळी गाडीने धडक दिल्याने स्विप्टने पुढील टोयाटोच्या गाडीला धडक दिली.यात जीवित हानी टळली मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवसभर असे अनेक छोटे,मोठे अपघात घडत आहेत.पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रेमापोटी अनेक दिवसापासून तेच कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याच्या कामगिरीवर नेमले आहेत.ते लक्ष्मी दर्शनासाठी दिवसभर वेगळ्याच ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त असतात.परिणामी नागरिकांना फटका बसत आहे.





