डांबर नव्हे,काळे आईल टाकून डांबरीकरण | डांबरीकरण उखडले | तालुक्यातील सर्वच रस्त्याची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करावी

0
27



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यात नगरपरिषद,जिल्हा परिषद व बांधकाम विभागाकडे असणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, मुरुमीकरण, डांबरीकरण, खड्डे भरण्याचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत; पण कामे निकृष्ट दर्जाची करून अधिकारी, ठेकेदार डांबराऐवजी ऑईलमिश्रित डांबर टाकून चुना लावत असल्याने खड्डे पुन्हा जैसेथे होत आहेत.





डांबरीकरणानंतर काही तासात काळे आईल टाकून टाकलेली छोटी खड्डी उखडत आहे.रस्ते कामातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येत असतानाही तालुक्यातील लोकप्रतिनिधीची चुप्पी अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. 

भल्यामोठ्या जत‌ तालुक्यात नगरपरिषद, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विविध रस्त्यांवर लाखो रुपयाची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या वतीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू असलेल्या अनेक रस्त्याच्या कामाचे खडीकरण, डांबरीकरण, खड्डे मुजवून कामे सुरू आहेत.





डांबरी रस्त्यावरील खड्डे मुजवताना डांबर कमी अन् खडी जादा टाकली जात असल्याने एका आठवड्यात ‘जैसे थे’ परिस्थिती होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here