सांगली : जतमधिल शेगाव
रोडवर सोेने देण्यासाठी जात असलेल्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात चटणी टाकून तब्बल साडेचार किलो सोने पळवून नेहण्यात आले होते.या दरोडा प्रकरणाचा तपास तोवीस तासात पोलीसांनी लावला आहे.याप्रकरणातील 5 संशयितासह अडीच कोटीचे साडेचार किलो सोने पोलीसांनी जप्त केले आहे.जत जवळच्या माळी वस्ती येथे घडलेल्या या प्रकाराचा एलसीबीच्या तीन पथकाने संयुक्त तपास करत संशयित पाच जणांना जेरबंद केले आहे.सराफ व्यापारी यांच्या सोबत आलेल्या मित्रांनेच दगा देत अन्य चौघाजणांसह दरोड्याचा कट रचत यशस्वी केला,मात्र सराफाची सतर्कता व पोलीसांच्या तीक्ष्ण नजरेने मित्रांचा बनाव उघड करत मुसक्या आवळत साडेचार किलो सोन्यासह पाच जणांना अटक केली आहे.
यात सोने व्यापाऱ्याचा भागिदाराचाही यात समावेश आहे,अशी पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
प्रविण उत्तम चव्हाण (वय 27, रा.य.पा.वाडी ता.आटपाडी),विजय बाळासाहेब नांगरे (वय 27,रा. य.पा.वाडी ता.आटपाडी),विशाल बाळू कारंडे (वय 27, रा. गोरेगांव ता.खटाव जि.सातारा),तात्यासो शेट्टीवा गुसाळे (वय 36, रा.मरडवाघ ता.खटाव जि.सातारा),वैभव साहेबराव माने (वय 32, रा.भोसरे ता.खटाव जि.सातारा)यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 2कोटी,27लाख,22हजार,880 रूपये किंमचीचे सोने,चारचाकी,पिस्तूल सारखे लायटर,मोबाईल जप्त केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी,
बाळासाहेब वसंत सावंत (रा.पळसखेड,ता.आटपाडी जि.सांगली) सध्या सराफ दुकान सराफ गल्ली खडीबाजार,हाऊस जि बेळगाव) हे बेळगाव हुन जत शेगाव मधील संजय नलावडे यांना सोने देण्यासाठी सांवत याची एक्सयुव्ही गांडी (नं.केए 22,एमबी 5422) ने निघाले असता,जतच्या पुढे शेगाव रोडवर सांवत व त्याचे कामगार प्रविण चव्हाण लघुशंखेसाठी गाडी थांबवली असता, त्याचे पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या ओमणी गाडी मधून चार जणांनी येऊन मारहाण करुन बाळासाहेब सावंत व त्याचे सोबत असले कामगार प्रविण चव्हाण याच्या डोळ्यात चटणी टाकत,रिव्हॉल्वरचा धाक
दाखवून गाडी ठेवलेले एकूण 4 किलो 530 ग्रॅम वजानाचे सोन्याचे बिस्कीटे घेऊन पलायन केले होते.सांवत यांनी तात्काळ जत पोलीस ठाणे घडलेला प्रकार सांगितला होता.पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, यांनी गुन्ह्याचे ठिकाणी भेट देवुन गंभीर स्वरुपाचा गुन्हा तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या.एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करुन गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.संशीयत फिर्यादी सांवत यांचा भागीदार प्रविण चव्हाण यांना चौकशीसाठी बोलवत,त्याचेकडे सखोल चौकशी केली असता,त्याचे बोलण्यात तफावत जाणवू लागल्याने त्याचेवर संशय बळावला,त्याना अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांने चार साथीदारासह सोने लुटल्याची कबूली दिली.
ते लुटलेले सोने वाटून घेवून व विक्री करण्यासाठी माझे साथीदार गुन्ह्यात वापरलेली ओमनी गाडीने मिरज पंढरपूर रोडवरील देशिंग फाटा येथे येणार असल्याचेही पोलीसांना सांगितले.पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी मिरज पंढरपूर रोडवरील देशिंग फाटा येथे सापळा लावून त्या चार जणांना अटक करण्यात आली.
संशयिताकडे प्रत्येकी 100 ग्रँम सोन्याची21 बिस्किटे,त्यांची किंमत सुमारे 1 कोटी 25 लाख,तसेच दोन किलो430 ग्रँस वजन असलेले तेजाब गाळलेले सोने,त्यांची किंमत सुमारे 1कोटी 21 लाखाचे सोने,ओमणी गाडी एक लाख रुपये,एक पिस्टल सारखे दिसणारे लाईटर,तीन वेगवेगळे कंपनीचे मोबाईल त्यांची किंमत 17 हजार,असा 2 कोटी,27 लाख,22 हजार,880 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अप्पर अधिक्षक मनिषा दुबुले,पोलीस उपअधिक्षक रत्नाकर नवले,पोलिस निरिक्षक उत्तम जाधव यांच्यासह सहा.पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान या दरोड्या प्रकरणी सराफ व्यापारी सांवत यांचा भागिदार प्रविण चव्हाण चव्हाण यांना सांवत हे सोने घेऊन येणार असल्याची माहिती होती,त्यानुसार त्यांने नियोजनबध्द आखणी करून हा दरोडा टाकला होता.दहशतीसाठी बनावट रिव्हॉल्वरचा वापर केला होता.मात्र पोलीसांच्या गतीने तपास यंत्रणेमुळे सर्व प्रकार उघड झाला आहे.स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांने तात्काळ तपास लावल्याबद्दल पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी 50 हजाराचे पारितोषिक देता गौरव केला.
जत येथे दरोडा प्रकरणी पकडलेले संशसित आरोपीसह पोलिस पथक





