निगडी खुर्द,वार्ताहर : निगडी खुर्द ता.जत येथे पुन्हा दुकाने,घरफोडीचा प्रकार घडला असून गावात गेल्या आठदिवसापासून चोरीचे सत्र सुरू आहे.शुक्रवारी मध्यरात्री विनोद रघूनाथ शिंदे यांच्या दुकानाचे स्वेटर तोडून साहित्य लंपास केले.
तर सुभाष शिवाजी पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य विस्कटून टाकले आहे.
गेल्या चार दिवसापासून निगडी खुर्द चोऱ्याचे सत्र सुरू असून पोलीसाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.पोलीसांनी चोरट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी आहे.





