सांगली : चेनस्नँचिंग करणारा गुन्हेगारा पोलीसांनी अटक केली.फैजान जमीर पखाली (वय 19,रा.मुजावर प्लँट सांगली)असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.चिरमणे गल्ली खणभाग सांगली परिसरातून एका महिला कामावरून घरी येत असताना दुचाकीवरून आलेल्या एका अनओळखी इसमाने हिसडा देऊन गळ्यातील गंठण पळविले होते.
त्या गुन्ह्याच्या तपास करत असताना फैजान पखाली संशयास्पद आढळून आल्याने त्यांची झडती घेतली असता चोरी केलेल्या गंठण आढळून आले.त्यांची किंमत 50 हजार आहे.गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.





