सांगलीत कोरोना लसीकरणांचा शुभारंभ | पालकमंत्री जयंत पाटील,लोकप्रतिनिधीची उपस्थिती

0
10



सांगली : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.   इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य कर्मचारी गोरखनाथ चंदणशिवे यांना सिरमची कोव्हीशिल्ड ही पहिली लस देण्यात आली.  








यावेळी खासदार धैर्यशिल माने, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, इस्लामपूर उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम. आर. देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विक्रम कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे, डॉ. अशोक शेंडे आदी उपस्थित होते. 

प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांनी लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या विभागांची पाहणी केली. तसेच सिरमची कोव्हीशिल्ड या लसीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय सांळुखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्याकडून जाणून घेतली. ज्या आरोग्य विभागीतील डॉक्टर व कर्मचारी यांना लस देण्यात येणार होती यांच्याशी संवाद साधला.  








कोरोनाची प्रथम लस घेणारे गोरखनाथ चंदणशिवे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोरोनाची कोव्हिशिल्ड ही लस पुर्णपणे सुरक्षीत असून गेल्या एक तासापासून मला कोणताही त्रास जाणवला नाही. कोरोना लस घेऊन कोरोना मुक्त व्हावे. आपण सुरक्षित तर आपला देश सुरक्षित असे ते म्हणाले. 

कोरोना लस घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लवी जाधव म्हणाल्या, कोरोनाचा समुळ नाश करण्यासाठी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. मी ही लस घेतली असून या लसीचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. ही लस पुर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन मी करीत आहे. 







जिल्ह्यात आज 9 ठिकाणी कोरोना लसीकरणाची सुरूवात झाली.

ग्रामीण रुग्णालय, पलूस येथे कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याहस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अरुणअण्णा लाड, महेंद्रआप्पा लाड उपस्थित होते. 

प्रथमिक आरोग्य केंद्र कवलापूर येथे आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मिरज पंचायत समितीच्या सभापती त्रिशल्या खवाटे, डॉ. सावंत, डॉ. शितोळे, डॉ. शेळके आदी उपस्थित होते. 








सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील हनुमाननगर येथील शहरी आरोग्य केंद्रात आमदार धनंजय गाडगीळ यांच्याहस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयुक्त नितीन कापडनीस, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल अंबोळे, डॉ. शितल धनवडे, डॉ. वर्षा पाटील, नोडल ऑफिसर डॉ. वैभव पाटील यांच्या नगरसेवक उपस्थिती होते. 

उपजिल्हा रुग्णालय कवठेमहाकांळ येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती आशा सुनिल पाटील यांच्याहस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. 

पद्मभुषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय (सिव्हील), सांगली, मिरज वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, भारती हॉस्पिटल सांगली, वॉनलेस हॉस्पिटल मिरज या ठिकाणीही कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here