सांगली : जतमधिल शेगाव रोडवर घडलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपींना पोलीसांनी 24 तासात केले जेरबंद केले असून त्यांच्याकडून अडीच कोटींचे सोने केलं हस्तगत केल्याची माहिती सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.या दरोड्यातील 100 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या पाच जणांना केली अटक, यात आटपाडीतील दोघांसह तर सातारा जिल्ह्यातील तिघांचा समावेश आहे.प्रवीण उत्तम चव्हाण, विजय बाळासाहेब नांगरे, विशाल बाळू कारंडे, तात्यासो शेट्टीबा गुसळे, वैभव साहेबराव माने अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
बेळगाव(कर्नाटक)येथून डिलिव्हीरी देण्यासाठी शेगावकडे येत असलेले सराफ व्यावसायिक बाळासाहेब सावंत याना मारहाण करत डोळ्यात मिरची पूड टाकून 2 कोटी 26 लाख 13 हजारांचे 4 किलो 530 ग्रॅम सोने लुटले होते.घटनेनंतर
पोलीसांनी गतीने तपास करत पथके रवाना केली होती.
घटनास्थळ,फोन लोकेशन,संपर्कातील नागरिकांच्या तपासणीतून पोलीस मुख्य दरोडेखोरापर्यंत पोहचत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पो.नि.सर्जेराव गायकवाड,सा.पो.नि.रविराज फडणीस,उपनिरिक्षक अभिजित सावंत दिलीप ढेरे व पथकाने गुन्हा उघडकीस आणला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दमदार कारवाई
दरोडयाचे गुन्हयात चोरलेले अडीच कोटीचे साडेचार किलो सोने २४ तासात हस्तगत पाच आरोपी जेरंबद केले जत पोलीस ठाणेच्या हदीमध्ये दिनांक १५.१.२०२१ रोजी रात्री ००.३० वा ते ०१.०० वा दरम्यान जत कडुन शेगाव कडे जाणा-या रोडवर फिर्यादीनामे बाळासाहेब वसंत सावंत रा पळसखेड (ता.आटपाडी जि.सांगली) संध्या सराफ दुकान सराफगल्ली खडीबाजार ) हाऊस नं जी शहापुर जि बेळगाव हे बेळगाव हुन जत शेगाव मधील संजय नलावडे रा शेगाव ता जत यास सोने देण्यासाठी फिर्यादी याची एक्सयुव्ही गांडी (नं केए २२ एमबी ५४२२ )मधुन निघाले असता, जतच्या पुढे शेगाव रोडवर फिर्यादी व त्याचे सोबत असले प्रविण चव्हाण लघुशंखेसाठी एक्सयुव्ही गांडी थांबवली असता, त्यावेळी त्याचे पाठीमागुन पांढ-या रंगाच्या ओमणी गाडी मधुन चार इसम येऊन माराहाण करुन फिर्यादी बाळासाहेब सावंत व त्याचे सोबत असले कामगार प्रविण चव्हाण याचे डोळ्यात चटणी टाकुन रिव्हॉल्वर याचा धाक
दाखवुन जबर मारहाण करुन त्याचे कब्जात एक्सयुव्ही गाडी ठेवलेले एकुन ४ किलो ५३० ग्रॅम बजानाचे सोन्याचे विस्कीटे सोन्याच्या रव्याचा गोल गोळा, व अँडराईड दोन मोबाईल,असा एकुन २,२६,१३,५००/रुपयाचा मुदेमाल जबरीने चोरुन नेले बाबत तक्रार जत पोलीस ठाणे येथे देण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले, यांनी सदर गुन्ह्याचे ठिकाणी भेट देवुन सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडण्याबाबत पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना सुचना दिल्या,त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडील सदर गुन्ह्याचे तपासकामी तीन वेगवेगळे
पथक तयार करुन वरील गुन्ह्याचा तपास चालु केला संशीयत फिर्यादी याचेकडे कामास असले इसमनामे प्रविण उत्तम चव्हाण( वय २७ रा.य.पा.वाडी ता.आटपाडी) यास पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी चौकशी कामी बोलावून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता,
त्याचे बोलण्यात तफावत जाणवु लागल्याने त्याचेवर संशय बळावलेने त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी माझ्या चार साथीदारांसह शेगाव ता.जत येथील सोन्याच्या लुटीचा गुन्हा केल्याचे कबुल
केले व ते लुटलेले सोने वाटून घेवून व विक्री करण्यासाठी माझे साथीदार गुन्ह्यात वापरलेली ओमनी गाडीने मिरज पंढरपूर रोडवरील देशिंग फाटा येथे येणार असल्याचे सागितले,त्यावेळी पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी मिरज पंढरपूर रोडवरील देशिंग फाटा येथे सापळा लावून त्या चार इसमाना तावेत घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने आपले खालील प्रमाणे सा्गितले आरोपीचे नाव प्रविण उत्तम चव्हाण (वय २७ रा.य.पा.वाडी ता.आटपाडी),विजय बाळासाहेब नांगरे (वय २७ रा. य.पा.वाडी ता.आटपाडी),विशाल बाळू कारंडे (वय २७ रा. गोरेगांव ता.खटाव जि.सातारा),तात्यासो शेट्टीवा गुसाळे (वय ३६ रा.मरडवाघ ता.खटाव जि.सातारा),वैभव साहेबराव माने (वय ३२ रा.भोसरे ता.खटाव जि.सातारा)
त्यावेळी त्याचे कब्जात
१) एकूण ४ किलो ५३० ग्रॅम वजानाचे सोन्याचे विस्कीटे सोन्याच्या रव्याचा गोल गोळा किंमत २.२६,१३,५००/-
२)ओमणी गाडी १००००/-
३)एक पिस्टल सारखे दिसणारे लाईटर
तीन वेगवेगळे कंपनीचे मोबाईल १००/-
४) तीन वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाईल १७०००/-
२,२७,२२,८८०/-
मिळाला सविस्तर पंचनाम्याने सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी जप्त करुन ताबेत घेण्यात आला, व पुढील तपासकामी जत पोलीस ठाणे येथे रिपोर्टने आरोपी गुन्हयातील मुदेमाल, गुन्हयातील वाहन असा मुद्देमाल वर्ग करणेत आला.सदरची कारवाई मा.पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकयाड , पोलीस निरीक्षक उत्तम जाधव,सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, अंच्युत सुर्यवंशी, जितेद्र जाधव, निलेश कदम, संदीप गुरव, अनिल कोळेकर,संदीप नलावडे,सतिश आलदर, प्रकाश पाटील,शशिकांत जाधव, सागर टिगरे, राजु मुळे, राहुल जाधव, आमसिध्दा खोत, मुदस्सर पाथरवट, स्वप्नील नायकोडे, कैप्टन गुंडवाडे, सुधीर गोरे, सोहेल कार्तीयानी, दिपक गट्टे, निसार मुलाणी, यांनी पार पाडली











