तालुकाभर विना परवाना गौण खनिज वाहतुक | लाल नोट्याच्या दर्शनाने महसूलची यंत्रणा दास

0
97



जत,प्रतिनिधी  : उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांमार्फत देण्यात येणाऱ्या गौण खनिज तात्पुरता उत्खनन परवानगीनुसार दगड, माती, मुरुम वाहतुकीसाठी, यापुढे वाहतूक परवाने वापरणे बंधनकारक असतानाही जत‌ तालुक्यात बेसुमार विना परवाना गौण खनिजे वाहतूक सुरू आहे.जत तालुक्यातील महसूलचे अधिकारी,मंडलअधिकारी, तलाठ्यांना लक्ष्मी दर्शन होत असल्याने थेट पांठिबा दिला आहे. जेथे लक्ष्मीदर्शन होत नाही,तेथे कारवाई करण्यात येत आहे.






महसूल व वनविभागाच्या 12 नोव्हेंबर, 2020 अन्वये गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक परवाना देण्याबाबत जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रारूप वापरले जाते. त्यामुळे वाहतूक परवान्याबाबत एकसंधता दिसून येत नाही. ज्यामुळे खोटे वाहतूक पास बनवून वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्व थांबवून राज्यातील वाहतूक परवान्यामध्ये एकसूत्रता येण्यासाठी संपूर्ण राज्यासाठी वाहतूक परवान्याचे प्रारूप निश्चित करण्यात आलेले आहे.







जिल्ह्यातील मंजूर सर्व खाण पट्टाधारकांना दगड, खडी वाहतुकीसाठी परवान्यासह वाहतूक करणे बंधनकारक केले आहे.वरील वाहतूक परवाना नसल्यास ही वाहतूक अवैध समजण्यात येऊन या वाहनावर कारवाई करण्याची तरतूद आहे.मात्र नियम पाळतील ते‌ अधिकारी कसले असा काहीसा प्रकार जत तालुक्यात सुरू आहे.






स्टोन क्रशरसाठी नियम ढाब्यावर



जत तालुक्यात अनेक स्टोन क्रशर बेकायदा व लगतच्या शेतकऱ्यांवर दादागिरी करून चालविण्यात येत आहेत.क्रशरसाठी दिलेला खोदकामाचा परवान्यापेक्षा जादा खनन क्रशर चालकाकाडून ‌करण्यात येत आहे. परवाना देणाऱ्या अधिकाऱ्याला लक्ष्मी दर्शन करून सर्वकाही सुरू आहे. दुसरीकडे क्रशरच्या धूळीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिंकाचे नुकसान होत आहे. थेट शेती क्षेत्र असणाऱ्या परिसरात अशा क्रशरना परवाना दिलाच कसा ? असा प्रश्नही उपस्थित होत असून हरित लवादाचे नियम येथे पाळायचे नाहीत असा पांयडा येथील अधिकारी,स्टोन क्रशर चालकांनी पाडला आहे.







लक्ष्मी दर्शनाने मंडल अधिकारी,तलाठी‌ मालामाल


जत तालुक्यात कोणताही परवाना न घेताच दिवसाढवळ्या मुरूम,दगड,मातीची वाहतूक सुरू आहे.आपल्या बापजाद्याची जायदाद असल्या सारखा प्रकार सुरू आहे.स्थानिक मंडल अधिकारी, तलाठ्यांना लाल नोटाचे लक्ष्मीदर्शन होत असल्याने सर्वजण हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसले आहेत.








शासनाचा कोट्यावधीचा महसूल फस्त


जत‌ तालुक्यात गेल्या दोन वर्षापुर्वी गौण खनिज वाहतूकीवर कडक कारवाईमुळे मोठा महसूल शासनाच्या तिजोरीत पडला होता.मात्र गेल्या वर्षभरापासून महसूल गोळा करायचा असल्याचा विसर अधिकाऱ्यांना पडला असून शासन एकीकडे आर्थिक अडचणीचा सामना करत असताना शासनाच्या महसूल जतेत अधिकारी,मंडल अधिकारी,तलाठ्यांनी फस्त केला आहे.







जतेतील अनेक तलाठ्यांच्याकडे कोट्यावधी माया



जत तालुक्यात येणारा प्रत्येक कर्मचारी माया गोळा करण्यासाठीच येत‌ असल्याने स्पष्टच आहेत.तालुक्यात गेल्या काही वर्षात तलाठ्या सारख्या कर्मचाऱ्यांनी कोट्यावधीची माया गोळा केल्या आहेत.त्यांच्यापुढच्या अधिकाऱ्यांच्या आर्थिक उन्नत्तीने डोळे फिरतील अशी स्थिती आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here