जतेत 572 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद | आता निकालाकडे लक्ष

0
13



जत,प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली गावागावातील लगबग, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ आज संपली आहे.जत तालुक्यातील 29 ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं तर कुठे मतदाना दरम्यान गालबोट लागलेलं पाहायला मिळालं.



सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. अखेर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 572 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झाले असून शेकडो कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला लागले आहेत.आता उमेदवार आणि कार्यकर्त्यांना 18 जानेवारीची म्हणजेच निकालाच्या दिवशीची वाट पाहावी लागणार आहे.एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते.



परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.



कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांनी मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान केलं.जत तालुक्यात आज झालेल्या 29 ग्रामपंचायतीसाठी सरासरी 83.38 टक्के मतदान झाले आहे.




शेगाव,अंकले,उमराणी,उटगी,भिवर्गीत चुरस पाह्याला मिळाली,तर अनेक गावात किरकोळ वादावादीनंतर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.कुठेही मशीन बंद पडण्याचे अथवा वादावादीचे प्रकार घडले नाहीत.


भिवर्गी ता.जत येथे मास्क वापरत सुरक्षित अंतर ठेवण्यात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here