जत,प्रतिनिधी : जत – शेगाव रोडवर सोने विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या सोनारांच्या डोळ्यात चटणी टाकून सुमारे 2 कोटी 26 लाख 13,500 रूपयाचे तब्बल साडेचार किलो सोने लुटल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी बाळासाहेब वसंत सावंत रा.पळसखेड ता.आटपाडी यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.
बाळासाहेब सांवत व अन्य एकजण हे गुरूवारी मध्यरात्री बेळगांव हून सोने विक्रीसाठी चारचाकी गाडीतून घेऊन येत होते.
शेगाव दरम्यानच्या माळी वस्तीनजिक त्यांनी लघुशंकेसाठी गाडी थांबविली असता,पाठीमागून आलेल्या अज्ञात चार संशयितानी सांवत व सहकार्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांना बेदम मारहाण करून गाडीतील 2 कोटी 26 लाख 13,500 रूपयाचे तब्बल साडेचार किलो सोने घेऊन पलायन केले आहे. गुरूवारी रात्री ही घटना घडली आहे.
पोलीसांची पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.







