जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पोलीसांच्या अनेक कारवाया नंतरही गावठी दारू,सिंदीचे कारखाने पुन्हा बहरले आहेत.
त्यामुळे गावागावातील शांती भंग होत असून अनेक मद्यपी दिवसरात्र नशेत राहत आहेत.या नशेमुळे किरकोळ कारणावरून गावागावात किरकोळ वादावादावरून तणाव निर्माण होत आहे.
जत पोलीस ठाण्याचे मवाळ अधिकारी,अर्थ तडजोड यामुळे दाखविण्याजोगी कारवाई केली जात आहे. तर भष्ट्र व झोपलेला उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रकार घडत आहेत.उत्पादन शुक्लचा वरिष्ठ अधिकारी मिरजेतून कारभार पाहत आहे.त्यामुळे जतचे कार्यालय सतत कुलूप बंद ठेवण्यात येत आहे.दुसरीकडे मिरज स्थित या अधिकाऱ्यांनी हप्ते वसूलीची यंत्रणा मात्र सक्षम उभारली असून तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्याकडून वसूलीसाठी चौघा खाजगी दलाल नेमले आहेत.त्यामुळे हानीकारक साहित्य वापरून बनविण्यात येत असलेली सिंदी,दारू कधी कुणाचा जीव घेईल हे सांगता येत नाही हे विशेष..
जत पोलीसांनी बेकायदा तयार केलेले दारू व सिंदी बँरेलने जप्त केली आहे.