निगडी खुर्द, वार्ताहर : जत तालुक्यातील निगडी खुर्द येथे चोरट्यांनी विद्युत मोटारीकडे मोर्चा वळविला असून दररोज दोन तीन मोटारी चोरीला जात आहेत.गेल्या दोन दिवसात शिवाजी शिंदे,साहेबराव शिंदे,पोपट गोडसे,सुभाष सांवत यांच्या विहिरीतील विद्युत मोटारी,स्टार्टर,पाईप चोरट्यांनी पळविल्या आहेत.
त्याचबरोबर बापूसो सांवत यांचे दुकान फोडून कांबळा,ड्रिलसह सुमारे वीस हजार रूपयाचे साहित्य चोरट्यांनी पळविले आहे.तसेच आशीर्वाद हॉटेलमधून गँस टाकी,रोख अडीच हजार असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. जतचे झोपलेले पोलीस कधी जागे होणार असा संतप्त सवाल उपस्थितीत होत आहे.
तक्रारीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना ठाण्याच्या महिला कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या भडीमाराला सामोरे जावे लागत आहे. एवढे करूनही चोरीचा तपास शून्य आहे.काही चोरटेच काही पोलीस कर्मचाऱ्यासोबत फिरत असल्याने तपास करायाचा कोणी असा सवाल शेतकरी विचारत आहेत.
दरम्यान बुधवारी काशीद वस्ती जवळील बंद घर फोडून चोरट्यांनी 45 हजार रोख,दीड तोळे सोने असा 1 लाख 5 हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला.याप्रकरणी पुजा सुरेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्या नातेवाईकांच्या लग्न कार्यासाठी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दिवसाढवळ्या घराचा पाठीमागचा दरवाज्या तोडून प्रवेश करत सोने व रोखड पळविली आहे.