जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गुरूवारी 4 नवे रुग्ण आढळून आले आहे.गुरूवारी कोरोनामुळे दोघाचा दुर्देवी मुत्यू झाल्याने मुत्यू झालेली संख्या 70 वर पोहचली आहे.
गुरूवारी जत शहर 3,रामपूर 1 येथे रुग्ण आढळले आहेत.तालुक्यात संख्या यामुळे दोन हजार पार झाली आहे.त्यापैंकी 1899 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर उपचारा दरम्यान 70 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. सध्या तालुक्यातील 32 जणावर उपचार सुरू आहेत.तर गुरूवारी 8 जण कोरोना मुक्त झाले आहेत.