पुढील वर्षी 30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2022 ला भरणार जतची यल्लमादेवी यात्रा

0
113




जत,प्रतिनिधी :जतच्या प्रसिध्द श्री.यल्लमा देवीची पुढील वर्षात दिनांक 30 डिसेंबर ते दिनांक 1 जानेवारी 2022 हे यात्रेचे प्रमुख दिवस राहतील.गुरुवार दि.30 डिसेंबर रोजी देविचे गंधोटगी, शुक्रवार दि.31 डिसेंबर रोजी देविचे नैवेद्य व शनिवारी दि.1जानेवारी रोजी देविचे किचाचा कार्यक्रम व सोमवार दि. 3 जानेवारी 2022 रोजी अमावस्या असा यात्रेचा कार्यक्रम राहील,अशी माहिती ट्रष्टचे अध्यक्ष श्रीमंत डफळे यांनी दिली.

यंदा कोरोनाचे पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असेलेली जत येथिल श्री.यल्लमा देविची यात्रा इतिहासात प्रथमच भक्ताविना पार पडली आहे.







महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री. यल्लमा देवीची यात्रा कोरोनामुळे या वर्षी प्रथमच रद्द करण्यात आली आहे.

मार्गशिर्ष महिन्यात श्री. यल्लमादेवी ची यात्रा दरवर्षी भरत असते.मात्र कोरोनाचा कहर अद्यार कायम असल्याने यात्रा कालावधीत प्रशासनाने श्री.यल्लमा देवी मंदिर परिसरापासून पाचशे मिटर अंतरापर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केल्याने व पोलीस प्रशासनाचे वतीने योग्य ती खबरदारी घेतली आहे.या परिसरात जाणारे भक्तांना मज्जाव करण्यात येत असल्याने यात्रा परिसरात सर्वत्र शुकशुकाट होता.








यल्लमा देवी प्रतिष्ठान व मंदिराचे पुजारी यानी इतिहासात पहिल्यांदाच मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत यात्रा कालावधीत होणारे देविचा गंधोटगीचा,देविला नैवेद्य दाखविणेचा व देविचे किचाचा हे सर्व कार्यक्रम पार पाडले.रवीवारी यात्रेचा शेवटच्या दिवशी देविची नगरपालखी प्रदक्षिणा व देविचे किचाचा कार्यक्रम होता.दरवर्षी प्रमाणे देविचे पुजारी हे पालखी सोबत घोड्यावरून नगरप्रदक्षिणेसाठी न जाता.श्री. यल्लमादेवी मंदिर परिसरात पालखी प्रदक्षिणा घालून नंतर देविचे पुजारी सुभाष कोळी यांनी अग्निकुंडात प्रवेश केल्यानंतर या वर्षीच्या यात्रेची समाप्ती झाली.








दरवर्षी श्री.यल्लमादेवी मंदिर परिसर यात्रा कालावधीत विविध व्यवसाईक व पाळणे, तमाशाचे फड, विविध मनोरंजनाचे खेळ व लाखो भाविकानी गजबजून जात होते.परंतु यावेळी इतिहासात प्रथमच ही यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याने देविच्या लाखो भक्तांना देविच्या दर्शनापासून दूर रहावे लागले आहे.रविवारी देविचे किचाचा कार्यक्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजेडफळे यांच्या अध्यक्षतेखाली जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला.








यावेळी जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, पोलीस पाटील मदन पाटील, प्रा.कुमार इंगळे, पालखीचे मानकरी, तसेच मनोहर कोळी,चंद्रकांत कोळी, अमर जाधव,गणपतराव कोडग,बाबासाहेब कोडग, बाळासाहेब जाधव,संग्राम शिर्के,मोहन मानेपाटील,पापा सनदी,अरूणराव शिंदे,विश्वनाथ सावंत आदि उपस्थित होते.याप्रसंगी श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी पुढील वर्षी भरविण्यात येणारे यात्रेच्या तारखा जाहीर केल्या. 







जतच्या प्रसिद्ध श्री.यल्लमा देवी यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here