भंडाऱ्यात रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे 10 बालकांचा मृत्यू | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले चौकशीचे आदेश
भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये अचानक आग लागल्यामुळे दहा बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.पहाटे दोनच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आली आहे. आगीतील धुरामुळे गुदमरुन या बालकांचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले आहे.या वार्डमध्ये सतरा बालकं दाखल होती.यापैंकी आगीतून सात बालके वाचवण्यात यश आले आहे.
भंडाराच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटला पहाटे दोनच्या दरम्यान धूराचे लोट निघत असल्याचं समोर येताच पळापळी झाली. नोकरीवर असलेल्या नर्सने वार्डचे उघडून बघिताच त्या रुममध्ये धूर झाला होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना यांची माहिती दिली.अग्निशमन दलाला प्राचारम करण्यात आले.रुग्णालयातील कर्मचारी,अग्निशामक दलाच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आले.

त्यात सात बालकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.मात्र श्वास गुदमरून दहा बालकाचा दुदैवी मुत्यू झाला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान रुग्णालये सुरक्षित नसतीलतर कुठे जायाचे असा गंभीर पडला आहे.