जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दोन ठिकाणी झालेल्या अपघातात एकाचा मुत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.विजापूर रोड येथे झालेल्या अपघातात लायप्पा सिद्राया पुजारी (वय 50)यांचा मुत्यू झाला आहे.सांयकांळी अवकाळी पावसामुळे दोन्ही घटना घडल्या आहेत.
याबाबत रात्री उशिरापर्यत जत पोलीसात गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.तालुक्यातील कुंभारी जत महामार्गावर कुंभारी नजिक तर दुसरा अपघात जत-विजापूर महामार्गावर अमृत्तवाडी नजिक झाल्याची माहिती रात्री उशिराने उपलब्ध झाली आहे.विजापूर मार्गावर भिषण अपघात झाला आहे.यात एकजण जागीच ठार झाला आहे. तर अन्य जखमींना उपचारासाठी हलविण्यात आला आहे.