डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील विमा प्रतिनिधी महादेव वठारे सर यांची भारतीय जीवन बिमा निगम मधून या वर्षीचा एमआरडीटी या मानाच्या किताबासाठी निवड झाली आहे.त्यांअतर्गंत त्यांना जागतिक विमा परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. यापुर्वीही त्यांची अमेरिका अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली होती.
जत पश्चिम भागात विमा प्रतिनिधी म्हणून त्यांनी नावलौकिंक मिळविला आहे. हाजारो नागरिकांचा विमा त्यांनी उतरविला आहे.
त्यांनी आतापर्यत डफळापूरला 50 हजार,बेंळूखी 25,जि.प.शाळेस 5 हजाराची बक्षिसे त्यांनी बिमा ग्राम करत मिळवून दिली आहेत.त्यांना सलग 15 वर्षे करोडपती विमा एंजन्ट,शतकवीर विमा प्रतिनिधी म्हणून गौरविण्यात आले आहे.
या यशासाठी शाखा अधिकारी बी.एन.वाघमारे,सौ.वळवी कर्मचारी,डफळापूर, बेंळूखी ग्रामस्थाचे सहकार्य लाभले.
डफळापूर ता.जत येथील विमा प्रतिनिधी महादेव वठारे यांनी अमेरिका दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.