जतचे दिनकर पंतगे कामगार सेनेचे राज्य प्रवक्ते
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सेवानिवृत्त कृषी अधिकारी,तथा कामगार सेनेचे नेते दिनकर पंतगे यांची कामगार सेनेच्या राज्य प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. सोलापूर येथे महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस कारमपुरी महाराज यांनी पंतगे यांना निवडीचे पत्र दिले.प्रभावी नेते,वक्तृत्व शैली,गाडा अनुभव यांची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे.

यापुढे या पदाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना अभिप्रेत असलेले शिवसेनेचे धोरण,विकासात्मक कामे,विचार,कामगार सेनेचे काम,भविष्यातील योजना,कामगारांच्या न्याय हक्कासाठी बाजू मांडू,असे निवडीनंतर पंतगे यांनी सांगितले.
जत येथील दिनकर पंतगे यांची महाराष्ट्र सेनेच्या प्रवक्तेपदी निवडीचे पत्र देण्यात आले