जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींच्या एकूण 278 जागांसाठी दाखल 914 अर्जांपैकी छानणीत केवळ 19 अर्ज अवैध ठरले. छानणीअंती 895 अर्ज वैध ठरले आहेत. येथील तहसीलच्या धान्य गोडावूनमध्ये छानणी प्रक्रिया पार पडली.निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसिलदार सचिन पाटील यांच्या उपस्थितीत छानणी प्रक्रिया पार पडली. यावेळी उमेदवार व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुतेक गावातील उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जाबद्दल हरकती घेणे टाळले.
टोणेवाडी येथील एक उमेदवार बिनविरोध निवडणून आला आहे.जात पडताळणी प्रमाणपत्राची पोहोच नसल्यामुळे अंकलगी येथील एक,एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त प्रवर्गात दाखल दोन अर्जातील एक अर्ज असे 16 अर्ज नामंजूर करण्यात आला.तीसरे अपत्य असल्यामुळे अंकलगी,घोलेश्वर प्रत्येकी एक या कारणामुळे 19 अर्ज अवैध ठरविण्यात आले. अवैध अर्जांची गावनिहाय संख्या अशी -अंकलगी 2,अंकले 7,डोर्ली 1,घोलेश्वर 2,गुड्डापूर 2,टोणेवाडी 1,उटगी 3,येळदरी 2
वैध अर्जांची संख्या गावनिहाय अशी :
अंकलगी (28),अंकले (43),भिवर्गी(33),धावडवाडी (27),डोर्ली (19),घोलेश्वर (26),गुड्डापूर (34),गुगवाड (36),जालीहाळ खुर्द (19),करेवाडी(ति) (21),कुडणूर(22)कुलाळवाडी (30),लमाणतांडा उटगी (11),लमाणतांडा (दरिबडची)(14),मेंढिगिरी(27),मो
आता लक्ष 4 तारखेकडे
आता अर्ज माघारी घेण्यालाठी पँनेल प्रमुखाकडून अर्ज दाखल उमेदवारांची मनधरणी सुरू झाली आहे.ता.4 जानेवारी नंतर पँनेलचे चित्र स्पष्ट होणार आहे.