जत,प्रतिनिधी : रेवनाळ ता.जत येथील अंकुश म्हाळाप्पा गणाचारी वय 50 या शेतकऱ्यांने राहत्या घरात गळपास लावून आत्महत्या केली.
हा प्रकार लक्षात येताच घरातील नातेवाईकांनी गणाचारी यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र तत्पुर्वी त्यांचा मुत्यू झाला होता.
जत पोलीसात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.कर्जास कंटाळून आत्महत्या केल्याचे गावात बोलले जात आहे.