वाढदिवस साजरा केल्याबद्दल 20 जणावर गुन्हा दाखल

0
3



जत,प्रतिनिधी : जमाव बंदी आदेश असतानाही गर्दी करून वाढदिवस साजरा केल्याबद्दल बंडू शिवाजी वाघमारे (रा.निगडी कॉर्नर,जत)यांच्यासह अनओळखी 20 जणावर जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला.






कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी आदेश आहे.तरही जत शहरात छत्रपती संभाजी चौक येथे गर्दी करत मटण  मार्केट मार्गावर ऐकता रँली काढत बेकादेशीर मोटारसायकल,चारचाकी वाहनाने रँली काढत आरडाओरडा करून फटाके वाजवत इतर लोकांना त्रास होईल असे कृत्य केल्याबद्दल बंडू वाघमारे व अनओळखी 20 जणांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलीस कायदा कलम 371(1)अतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी रामेश्वर पाटील यांनी तक्रार दिली आहे.अधिक तपास हवलदार श्री.कणसे करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here