जत,प्रतिनिधी : भूमि अभिलेख कार्यालयाने तिसऱ्याच व्यक्तीची वारस म्हणून केलेली नोंद रद्द करून मुख्य वारसाचे नाव नोंद करावे,या मागणीसाठी मेंढिगिरी ता.जत येथील श्रीमती सुलोचना विलास गलगली आजपासून आमरण उपोषणास बसणार आहेत.तसे निवेदन त्यांनी संबधित विभागाला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे,तक्रारदार सुलोचना गलगली यांचे पती विलास रुद्राप्पा गलगली यांचे 21/9/2002 ला मयत झाले आहेत.त्यांची एकत्रित कुंटुंबाची मालमत्ता आहे.त्यातील काही मालमत्तेवर वारस नोंद केली आहे.
अशाच आणखीन एका मालमत्तेची नोंद करण्यासाठी सुलोचना गलगली ह्या भूमि अभिलेख कार्यालयात अनेक वेळा वारस नोंदीचा अर्ज देण्याचा प्रयत्न केला.मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनचे कारण सांगून अर्ज स्विकारला नाही.लॉकडाऊन नंतर सुलोचना गलगली ह्या वारस नोंदीसाठी गेल्या असता तेथे इतरांची नावे नोंद केली होती.
याबाबत सुलोचना यांनी विचारणा केली असता त्यांना तेथील कर्मचाऱ्यांनी दमदाटी करून हाकलून दिले.त्यांनतर सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांना घेऊन गेलो असता आठ दिवसात तुमचे नाव लावतो असे आश्वासन दिले होते.मात्र अद्यापपर्यत वारस नोंद केले नसल्याने आज ता.17 रोजी सुलोचना गलगली ह्या आमरण उपोषणास बसणार आहेत.