सोन्याळ,वार्ताहर : राज्य शासनाच्या वतीने मागील वर्षभरात अनेक लोकोपयोगी आणि योजनांचा शुभारंभ करण्यात आला आहे.त्याच अनुषंगाने आता महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचा आणि अंगणवाड्यांचा भौतिक विकास करून त्याचा शैक्षणिक उपयोग करण्यात येणार असून याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.
तसेच या प्रकल्पाविषयी राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्र्यांनीही या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाल्यास देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत. महाराष्ट्रातील बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषद शाळातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहेत.
महात्मा गांधी रोजगार हमी
योजनेअंतर्गत अंगणवाडी, शाळेसाठी किचन शेड, इमारतीसाठी रेन वाँटर हारवेस्टींग संरचना, परिसरात शोषखडे, शौचालय, खेळाचे मैदान,संरक्षक भिंत, वृक्ष लागवड (बिहार पॅटर्न)आवश्यकतेनुसार शाळा,अंगणवाडीच्या परिसरात पेविंग ब्लॉक,बाहेर काँक्रिट नाली बांधकाम,शाळा, अंगणवाडीकडे येणारे रस्ते गुणवत्तापूर्ण करणे, बोअरवेल पुनर्भरण (बोअरवेल असल्यास) गांडूळ
खत प्रकल्प (यामध्ये तयार होणारे गांडूळ खत शाळा/ अंगणवाडीच्या परिसरातील झाडांसाठी वापरता येईल. नाडेप कंपोस्ट खत तयार करणे शक्य होणार आहे..