जत शहराला अतिक्रमणाचा विळखा | मुख्याधिकारी बकालपण बदलणार काय?

0
6



जत,(प्रतिनिधी):जत शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून मंगळवार पेठेकडं पाहिलं जातं,याठिकाणी रस्तावर होणाऱ्या अतिक्रमानामुळे सतत वाहतूक कोंडी होत असल्याने येथील जनता व व्यापारी हवालदिल झाले आहेत.महाराणा प्रताप चौक ते महाराष्ट्र बँक शहरातील या प्रमुख मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहनाचे चुकीचे पार्कींग,रस्त्याच्या दुतर्फा बसणारे भाजी विक्रेते,हातगाडीवाले तसेच दुकानाच्या बाहेर असलेले अतिक्रमण या सर्व प्रमुख समस्यांनी जत बाजारपेठ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्यया आहेत,आणि बाजारात सुसूत्रता आणण्याची मागणी केली आहे. 



पण नगरपरिषदेेेेने याकडे जराही लक्ष दिले नसल्याचे जारपेठेतील भारतीय स्टेट बँकेची शाखा मुख्य बाजार पेठेत आहे.याठिकाणीच भाजीविक्रेते रस्तावर थाट मांडून बसलेले असतात.त्याच ठिकाणी एटीमसाठी ग्राहकांची रांग, बँकेत येण्या-जाण्याची वर्दळ सुरु असते.यामुळे येथे सतत कोंडी निर्माण आहे. तालुक्यातील 123 गावे हे जत शहरातील बाजारपेठेवर अवलंबून आहेत.प्रत्येक गावातील नागरिकांनी दररोज जत बाजारपेठला ये-जा करत असल्याने बाजारपेठेत गर्दी होत असते.



महाराणा प्रताप चौक ते जत नगरपरिषद हा रास्ता म्हणजे पाच दहा फुटाची पाऊलवाट अशी स्थिती झाली आहे.दुतर्फा बाजूनी व्यापाऱ्यांचे अतिक्रमण आणि रस्त्यावर बसणारे व्यापारी यात रास्ता भरून गेला आहे.त्याशिवाय शहरातील शेगाव चौक ते बिळूर रोड,संभाजी चौक ते  पोलीस ठाणे रस्त्यासह शहरातील रस्त्यावर मांडलेल्या बेकायदा खोक्यामुळे शहराला बकालपण, विद्रुपीकरण केले आहे.



शहरातील मुख्य रस्त्यावर अशी वाहने उभी केली जात आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here