जत,प्रतिनिधी : आंवढीसह कोरडा नदी पात्रातून वाळू तस्करीतील वाहने सोडविण्यासाठी महसूल मधील अधिकारी,कनिष्ठ कर्मचारी व त्याचे काही फंटर कार्यरत असल्याची चर्चा असून महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी करूनही त्यांच्याकडून अशा अधिकाऱ्यांना अभय दिले जात असल्याचे आरोप होत आहे.
ओढापात्रे,कोरडा नदीसह शेगाव मार्गे तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूची वाहतूक व विक्री केली जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. आंवढी येथून वाळू वाहतूक करणारा टिपर,बेकायदा वाळू साठा सापडल्याने तस्करी जगजाहीर झाले आहे.या भागातून चालणाऱ्या वाळू तस्करीला महसूल मधील एक अधिकारी,चतुर्थ कर्मचारी व काही नेत्याबरोबर फोटो काढणारे फंटर मदत करत असल्याचे आरोप होत आहेत.
चुकून पोलीसांनी वाळू तस्करी करताना वाहन पकडले तर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे काही पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले.