जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील रस्त्यांना लागलेले खड्ड्याचे ग्रहण सुटायचे नाव घेत नसल्याचे सातत्याने समोर येत आहे. तालुक्यातील सनमडी ते टोणेवाडी(पवारवाडी) पर्यंतचा रस्ता गेल्या दोन वर्षापासून अर्धवट ठेवला आहे.त्याचे बिलही काढले असण्याची शक्यता असून यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अन्यथा आंदोलन करू,असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
सनमडी ते टोणेवाडी(पवारवाडी)असा दोन्ही गावांना जोडणारा हा रस्ता आहे. दोन वर्षापुर्वी या रस्त्याच्या एक किलोमीटरचे अर्धवट काम करण्यात आले आहे. संबंधित ठेकेदारांने खड्डी पसरून फक्त रोलिंग करून काम अर्ध्यावर सोडून देण्यात आले आहे.
सध्या रस्त्यावरील खड्डी वर्ती आली आहे.मोठ्या प्रमाणात खड्डेही पडले आहेत.
गेल्या दोन वर्षापासून तक्रारी करूनही संबधित ठेकेदार या कामाकडे फिरकलेला नाही.शिवाय काम पुर्ण झाल्याचे दाखवून पैसेही काढले असल्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करत आहेत. या रस्ता कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून सत्य बाहेर काढत नव्याने रस्ता करावा अशी मागणी प्रवीण पवार यांनी केली आहे.
सनमडी-टोणेवाडी(पवारवाडी) रस्त्याची झालेली दुरावस्था