जत,प्रतिनिधी : पुणे पदवीधर मतदार संघातील उमेदवारांचा प्रचार अतिंम टप्यात आला आहे.जत तालुक्यातील 12 हजार पदवीधराचा पाठिंबा कुणाला ? हे अद्याप स्पष्ट होत नसल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकात चिंता वाढली आहे.
जत तालुक्यात पदवीधराची नोंदणी यावर्षी स्वयंस्फूर्तीने दुप्पटीने झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने निवडणूकीचे वेध लागले आहेत.ही निवडणूक शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी,भाजप या पक्ष पातळीवर चुरशीने होणार आहे.
सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्हाचा समावेश असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबरला होणार आहे.यावर्षी जत तालुक्यात पदवीधरांनी स्वंयमस्फूर्तेने नोंदणी केली आहे.जत तालुक्यात अरुणअण्णा लाड,सारंग पाटील यांनी पदवीधराची नांव नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.जिल्ह्यात पदवीधर साठी 79 हजार 496 मतदार आहेत.जत तालुक्यात 12 हजार मतदार आहेत.गेल्या निवडणूकीत जत तालुक्यात 6 हजार मतदार होते.राष्ट्रवादी बंडखोर अरुणअण्णा लाड यांना चांगली मते मिळाली होती.राष्ट्रवादी-काँग्रेसचे सारंग पाटील यांच्या मतविभागणीमुळे तालुक्यात भाजपचे आ.चंद्रकांत दादा पाटील यांना किरकोळ आघाडी मिळाली होती.
या निवडणूकीसाठी भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, जनता दलाचे प्रा शरद पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रा.सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुणअण्णा लाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. सध्या फोन काँल,टेक्स्ट मेसेज, वाँटसअपच्या माध्यमातून मतदाराशी संपर्क साधला जात आहे. भाजपा व महाविकास आघाडीच्या प्रमुख दोन्ही उमेदवारांच्या लढतीकडे लक्ष लागून राहिली आहे. देशमुख व लाड या दोन्ही उमेदवाराचे तालुक्यात साखर कारखानाच्या माध्यमातून ऊसतोडणी मुकादम, मजूर यांच्या माध्यमातून संबंध आहेत.त्यामुळे तालुक्यात चुरशीने मतदान होणार आहे.
तब्बल 62 उमेदवार यंदा आमदार होण्यासाठी निवडणुकीत तरुणांचा कौल मागत आहेत.यापैकी 12 उमेदवार हे पक्षाकडून आहेत तर अपक्ष उमेदवारांची संख्या 50 इतकी आहे. मोठ्या संख्येने उभे ठाकलेले कुणासाठी हितकारक व कुणासाठी मारक ठरतात हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.








