जत,प्रतिनिधी : कोल्हापूर (करविर) नगरी पासून 55 कि.मि.अंतरावर असलेल्या राधानगरी येथे छत्रपती शाहू महाराज यांनी खास हत्तींसाठी बांधण्यात आलेल्या हत्तीमहालचे कोल्हापूरकर ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करीत आहेत.याउलट जत तहसिल कार्यालयाची चिरेबंद दगडात बांधकाम केलेली अद्यापही सुस्थितीत असलेली जत संस्थानची ऐतिहासिक ठेवा असलेली इमारत प्रशासन प्रशासकिय इमारतीच्या बांधकामासाठी जमीनदोस्त करण्याची तयारी करू लागल्याने जतकरानी आपला संस्थानकालिन ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी संस्थानकालिन इमारतीचे बांधकाम पाडण्यास विरोध करावा,असे आवाहन (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट) सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे.
कांबळे म्हणाले की,कोल्हापूर (करविर) नगरीचे राजे छत्रपती शाहु महाराज यांना शिकारीचा छंद होता. त्यासाठी त्यांनी हत्ती ही आपल्या पदरी ठेवले होते. या हत्तींच्या निवारेची सोय व्हावी म्हणून महाराजांनी करविर नगरी पासून 55 कि.मी.अंतरावर असलेल्या राधानगरी येथे लहानमोठ्या हत्तींसाठी हात्ती महालाचे चांगल्या प्रकारे बांधकाम करवून घेतले होते.
आज या ऐतिहासिक हात्ती महालाची अवस्था खराब झाल्याने शिवाजी विद्यापिठ कोल्हापूरचे राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी व वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे देवनागरी येथील दुर्लक्षित हत्तीमहाल या ऐतिहासिक वास्तुची स्वच्छता करण्याच्या कामाला लागले असून या ऐतिहासिक वास्तुची चांगल्या प्रकारे डागडुजीही करण्यात येत आहे. ही वास्तू आता यापुढे पर्यटकांना आकर्षित करणारी ठरणार आहे.त्यादृष्टीने शिवाजी विद्यापिठ व कोल्हापूर वनविभाग यासाठी परिश्रम घेत आहेत.
या उलट सद्धस्थितीत असलेली जत तहसिल कार्यालयाची इमारत ही संस्थानकालिन इमारत असून शंभर वर्षे होऊन गेली तरी ही इमारत आजही भक्कम स्थितीत डौलाने उभी आहे. या इमारतीचे बांधकाम हे चून्याचा वापर करून चिरेबंद दगडात केलेले आहे.
ही इमारत आजही भक्कम स्थितीत असून शंभर वर्षे होऊन गेली तरी ही या इमारतीचा एकही चिरा हललेला नाही. ही इमारत जत संस्थानचा इतिहासाची साक्ष असणारी जुनी ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करावी.प्रशासकीय इमारत अन्य ठिकाणी बांधण्यात यावी,अशी आमची फार पूर्वीपासूनची मागणी आहे,असेही कांबळे म्हणाले.
यापूर्वी ही आम्ही विरोध केल्यामुळे तसेच ही ऐतिहासिक वास्तू ज्या संस्थानिकानी बांधली त्या संस्थानिकांचा सुद्धा ही इमारत पाडण्यास विरोध आहे.
प्रशासनाने ही ऐतिहासिक संस्थानकालिन सुस्थितीत असलेली इमारत पाडण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याबद्दल जत संस्थानचे वारस व श्री.यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने ही ऐतिहासिक संस्थानकालिन इमारत न पाडता त्याठिकाणी ऐतिहासिक मुझीयमची उभारणी करावी,अशी मागणी ही डफळे यानी केली आहे. टयापूर्वी माजी आमदार विलासराव जगताप यांनी ही ऐतिहासिक संस्थानकालिन सुस्थितीत असलेली इमारत आहे.ती तशीच ठेवून प्रशासकीय इमारतीचा आराखडा मंजूर करून घेतला होता.परंतु आता प्रशासनाने पूर्वीच्या आराखड्यात बदल करून नविन होत असलेल्या प्रशासकिय इमारतीसाठी संस्थानकालिन इमारत भुईसपाट करून त्या जागेवरच नविन प्रशासकीय इमारत उभी करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.
संस्थानकालिन ईतिहासाची साक्ष असलेली ही इमारत न पाडता अन्य ठिकाणी प्रशासकीय इमारत उभी करावी अशी आमची मागणी असून यासाठी आम्ही प्रशासनाबरोबर संघर्ष करण्यास ही तयार आहे.ही इमारत आजही भक्कम स्थितीत डौलाने उभी आहे .प्रशासनाने ही इमारत न पाडता या इमारतीमध्ये जत संस्थान कालीन ऐतिहासिक शस्त्रास्त्रे व संस्थानच्या इतिहासाचे प्रदर्शन भरवून या वास्तुचे ऐतिहासिक मुझीयम करावे अशी आमची मागणी आहे,असेही कांबळे म्हणाले.
डफळे संस्थानच्या इतिहासाची साक्ष असलेलली मजबूत इमारत