दरिबडचीतील कार्डधारकांची दुसऱ्या दिवशीही तपासणी

0
2



दरिबडची,वार्ताहर : दरिबडची ता.जत येथे स्वस्तधान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेहणारे धान्य सापडल्यानंतर सुरू असलेल्या कार्ड धारकाची सलग दुसऱ्या दिवशी संख अप्पर तहसीलदार म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी,जबाब घेण्यात येत आहे.दरम्यान जप्त केलेले धान्याची तपासणी करण्यात येत आहे.









गावातील दोन्ही दुकानाकडील रेशन कार्ड धारकांना धान्य मिळाले का?,किती पैसे घेतले ?,मोफत धान्य मिळाले काय? अशा प्रश्नाचे जबाब घेण्यात येत आहेत.मात्र कन्नड भाषिक कार्डधारक यामुळे मर्यादा पडत आहेत.पुर्ण तपासणी नंतर पुढील कारवाईबाबत अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.








दुकानदाराचा नागरिकांनी पर्दापाश केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महसूल विभागाकडून गावातील संबधित दोन्ही स्वस्तधान्य दुकाने सील करत,रेशनकार्ड धारकाची तपासणी व जबाब घेण्यात येत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here