जत-डफळापूर रस्ता एकादा जीव गेल्यावर दुरुस्त करणार काय? | बसवराज पाटील यांचा सवाल

0



जत,प्रतिनिधी : जत ते सांगली दरम्यान डफळापूरपर्यतचा रस्ता हा असून अडचण नसून खोळंबा झाला आहे.खड्ड्याच्या हा रस्त्यामुळे वाहनधारकांचे, प्रवाशांचे हाल होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ बघ्याची भूमिका निभावत आहे.हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे नूतन तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिला आहे. 







Rate Card



रस्त्यांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालक व प्रवाशांना

शारीरिक व्याधींचा त्रास वाढला आहे.अनेकांमध्ये पाठीच्या व मानेचे दुखणे बळावले आहे.बऱ्याचदा गरोदर माता व वृद्धांसाठी हा रस्ता पार करणे म्हणजे मैलाचा दगड ठरतो.सध्या कोरोना महामारीच्या काळात काही रूग्णांचे अचानक प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारासाठी सांगली मिरजेच्या हॉस्पिटलमध्ये रूग्णांना नेण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो पण हा रस्ताच पूर्णपणे उखडून गेल्याने रूग्ण वाटेतच दगावण्याची शक्यता आहे.




Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.