जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील येळवी जत रस्त्यावर चोरीचा प्रकार घडला आहे.निलाबाई महादेव नरळे (वय 50,टोणेवाडी,सध्या अलिबाग,जि.रायगड) यांना चाकूचा धाक दाखवत गळ्यातील मंगळसुत्र,कानातील फुले असे अडीच तोळ्याचे दागिणे लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.घटनेची माहिती मिळताच जत पोलीसाचे पथक घटनास्थळी पोहचत तपास सुरू केला आहे.
अधिक माहिती अशी, मुळ टोणेवाडी निलाबाई नरळे सध्या अलिबाग ता.रायगड येथे राहतात.सोमवार (ता.23)दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जतकडे जाण्यासाठी येळवी बसस्टँडवर थांबल्या होत्या.दरम्यान एक पांढऱ्या रंगाची चार चाकी गाडी त्याठिकाणी उभी राहिली.गाडीच्या चालकांने गाडी जतला चालली आहे.तुम्ही येणार आहात काय ? म्हणाल्याने निलाबाई त्या गाडीत बसल्या.पुढे थोड्या अंतरावर आणखीन दोन इसम त्या गाडीमध्ये बसले.ते दोघे महिलेच्या दोन्ही बाजूला बसले होते.
पुढे येळवी काही अंतरावरील निर्जनस्थळी महिलेच्या बाजूला बसलेल्या इसमांनी निलाबाई यांना चाकूचा धाक दाखवत गळ्यातील गंठण,मंगळसुत्र व कानातील फुले असे अडीच तोळ्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.पुढे हगिरगे ता.सांगोलाकडे जाणाऱ्या फाट्यावर निलाबाई यांना गाडीतून खाली उतरवून गाडी भरधाव वेगाने परत येळवीकडे निघून गेली.निलाबाई वाटेने जाणाऱ्या काहीजंणाना थांबवत घडलेली घटना सांगितले.त्यांनी जत पोलीसांना कळविल्यानंतर घटना समोर आली आहे. महिलेच्या जबाबवरून पोलीसाकडून कसून तपास सुरू आहे. गाडीतील संशयित 30 ते 35 वयोगटातील असून अंगाने जाड काळे,सावळे रंगाचे आहेत.
दरम्यान काही महिन्यापुर्वी या मार्गावर जतकडे येणाऱ्या एका महिलेला गाडीत बसवून अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती.पुन्हा महिलेला लुटण्याचा प्रकार घडला आहे.जत पोलीसाकडून संशयित गाडी व आरोपीचा शोध सुरू आहे.संशयित गाडी व आरोपीबाबत काही माहिती द्यावी,असे सोशल मिडियावरूनही आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान पोलीसाकडून संबधित मार्गावरील सीसीटिव्ही,रस्त्यावरील व्यवसायिकांकडून माहिती मिळविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यत जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.