पुन्हा जत शहर पोलीसाच्या निगराणीखाली

0
6



जत,प्रतिनिधी : गेल्या वर्षी जत‌ शहरात बसविण्यात आलेले सीसीटिव्ही यंत्रणा गेल्या अनेक महिन्यानंतर अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे.शहरातील वाढत्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र अधिकारी विश्वास नांगरेपाटील यांच्या सुचनेनुसार नगरसेवक उमेश सांवत,काही दानसुर नेते व शहरातील व्यापाऱ्यांच्या लोकवर्गणीतून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गांधी चौक,उमराणी रोड या भागात बसविण्यात आले होते.त्यामुळे शहरात गर्दी,छोट्या-मोठ्या चोऱ्यासह,मोबाईल,दुकाने,घरफोडीच्या प्रकाराला चाप बसला होता.








मात्र एका ट्रकने या सीसीटिव्ही यंत्रणेच्या मुख्य संकलन संचाला धडक दिल्याने सर्व यंत्रणा बंद‌ पडली होती.त्यामुळे पुन्हा मोबाईल चोरीसह छोट्या,मोठ्या चोऱ्या वाढल्या होत्या.त्यामुळे सातत्याने सीसीटिव्ही चालू करण्याची मागणी होती.मात्र नगरपरिषदेने दुरूस्तीबाबत हात वर्ती केल्याने,दुरूस्तीचा खर्च कोणी करायचा यामुळे अनेक दिवस त्याकडे दुर्लक्ष झाले होते.सीसीटिव्हीची यंत्रणा तात्काळ चालू करावी,अशी मागणी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सह अनेक लोकप्रतिनिधीनी केली होती. जिल्हापोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.उत्तम चव्हाण, पोलीस नाईक‌ सचिन जंवजाळ,उमेश सांवत यांनी पुढाकार घेअसोसिएशनचे अध्यक्ष किरण बिज्जरगी,शिवप्रतिष्ठानचे‌ शहराध्यक्ष संग्राम पवार,शिवसेनेचे शहरप्रमुख विजयराजे चव्हाण,सुहास चव्हाण,राघवेंद्र चौगुले,

मयुरेश सावंत व शहरातील व्यापारी व हनुमान जीर्णोद्धार कमिटी यांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून पुन्हा शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा नव्याने दुरूस्ती करून गुरूवारपासून सुरू केली आहे.दरम्यान पुन्हा जत शहर पोलीसांच्या निगराणीखाली आले असून यापुढे‌ शहरातील वाहतूक कोडी,चोरीच्या घटनावर पोलीस ठाण्यातून नियत्रंण ठेवणे शक्य‌ होणार आहे.








आणखीन कँमेरे वाढविण्याचा प्रयत्न


जत शहरात तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरेपाटील यांच्या आवाहना नुसार शहरात आम्ही व लोकवर्गणीतून काही चौकात कँमेरे बसवून शहर पोलीसांच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला होता.मात्र गेल्या सीसीटिव्ही यंत्रणा बंद‌ पडल्याने धोका वाढला होता.नव्याने पोलीसांच्या आवाहनानुसार‌ पुन्हा सीसीटिव्ही सुरू करण्यात आले आहेत.यात कँमेरे मर्यादीत‌ चौकात‌ आहेत.पुढील काही दिवसात लोकप्रतिनिधी,समाजसेवी संस्था,व्यापाऱ्याच्या‌ माध्यमातून कँमेरे वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत.



– उमेश सांवत,नगरसेवक




आमचे काम सोपे झाले


मोठा विस्तार असलेल्या जत शहरात सीसीटिव्ही असणे गरजेचे होते मात्र ही यंत्रणा बंद पडल्याने अडचणीचे ठरत होते. आता ही यंत्रणा सुरू झाली आहे. त्यामुळे जत शहरातील प्रमुख चौक,रस्त्यावर आम्हाला पोलीस ठाण्यातून नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. भविष्यात संपूर्ण शहर सीसीटिव्हीच्या  निगरानी खाली आणण्याचा आमचा प्रयत्न राहील  



– उत्तम जाधव,पो.नि.जत





 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here