जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात पदवीधर निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी तालुक्यात पदवीधरांची नोंदणी यावर्षी दुपटीने झाली आहे. निवडणूक जाहीर आहेत. ही निवडणूक शिवसेना, काँग्रेस, झाल्याने निवडणुकीचे वेध लागले राष्ट्रवादी, भाजप यांच्यात चुरशीने होणार आहे.सांगली, कोल्हापूर,सातारा,सोलापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 1 डिसेंबरला होणार आहे.
यावर्षी जत तालुक्यात पदवीधरांनी स्वयंस्फूर्तीने नोंदणी केली आहे. जिल्ह्यात पदवीधरचे 79 हजार 496 मतदार आहेत.जत तालुक्यात 12 हजार मतदार आहेत.पदवीधर मतदारसंघात एखाद-दुसरा अपवाद वगळता भाजपने विजय मिळविला आहे.आताही रणनीतीची आखणी आहे. या आधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रतिनिधित्व केले.एकदा भाजपला दणका देत जनता दलाचे प्रा. शरद पाटील विजयी झाले.मागील निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारली होती.गेल्या निवडणुकीत जत तालुक्यात 6 हजार मतदार होते.राष्ट्रवादी बंडखोर अरुण लाड यांना चांगली मते मिळाली होती.
राष्ट्रवादी-काँग्रेसचे सारंग पाटील यांच्या मतविभागणीमुळे तालुक्यात भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांना किरकोळ आघाडी मिळाली होती.यंदा निवडणुकीत मतदारांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी सर्व पक्षांची रणनीती सुरु आहे.
उमेदवारांकडून रणनीतीची सोशल मीडियावरुन मतदारांशी संपर्क मतदारांशी संपर्क साधला जात आहे.सध्या तालुक्यात सोशल मीडियावरुन उमेदवारांकडून जोरदार रणनीती तालुक्यात चुरशीने मतदान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे आखली जात आहे.