जत,प्रतिनिधी : उमराणी ता.जत गावातील शाळेच्या आवाराभोवती तसेच उमराणी ग्रामपंचायत हद्दीतील राखीव असलेल्या मुख्य ठिकाणच्या जागेवर ग्रामपंचायतील गावगुंड सदस्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन गरज नसलेल्या नागरिकांना तसेच त्यांच्या पक्षातील,नेते,नातेवाईकांना व आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी जागा बळकावत,अतिक्रमण केले आहे. त्यांची चौकशी करून तातडीने अतिक्रम हटवावे,अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना दिले आहे.
गावातील प्रमुख चौक,वनविभाग,ग्रामपंचायतीच्या जागेवर गावातील गावगुंडांच्या मदतीने झालेल्या अतिक्रमणाला गामकामगार तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमत करुन आर्थिक आमिषापोटी पाठीशी घालत आहे.त्यामुळे ग्रामपंचायत हक्काच्या जागांना मुकणार आहे.पुढे येऊ घातलेल्या निवडणूक डोळ्यासमोर ग्रामपंचायतीच्या सत्ताधारी गटाच्या समर्थकांना खिरापत वाटल्यासारख्या शासकीय जागा वाटण़्याचा सपाटा सत्ताधारी मंडळीनी लावला आहे.
तो थांबवावा,अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा दिला आहे. यावेळी दुंडाप्पा बिरादार,राजेंद्र खांडेकर,सिध्दप्पा खांडेकर उपस्थित होते.